जिनीव्हा : आता तुमच्यापैकी अनेकांकडे 3G मोबाईल्स असतील. आता यापुढील व्हर्जन कोणतं, असं विचारलं तर साहजिकच तुम्ही म्हणाल की 4G... काही नाही सोप्पंय... प्रत्येकवेळी Gअक्षराच्या मागे एकेक क्रमांक वाढवत न्यायचा. सध्याचा जमाना 3Gचा पण तुम्हाला 2G आणि 1G तरी कुठे माहिती होते. म्हणजे तुम्ही ते वापरत होतातच, पण त्यांना कोणतं जी लावायचं, हे तितकंसं स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. 2G घोटाळ्याची जेवढी चर्चा झाली, तेवढीही किमान प्रत्यक्षात 2G वापरण्याची झाली नाही. 3G बँडविड्थच्या लिलावा मिळालेल्या प्रतिसादानंतरच आपल्याला 2Gच्या घोटाळ्याची कल्पना आली.
जाऊ द्या, हा जीजीचा घोळ तसा किचकटच आहे, बाजारात जो फोन अद्ययावत असेल, तो वापरायचा. त्यात काय एवढं... बोलणं तर प्रत्येकातच होतं की. 2G काय किंवा 3G, 4G काय आपल्याला सगळं सारखंच... पण अजून आपण 3G नीटसं वापरायला शिकलो नाहीत, संबंध महाराष्ट्रात अजून सगळ्या ऑपरेटर्सचं 3G नाहीय, काही मोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईसारख्या, त्यातही अनेक उपनगरांमध्ये नाही. अशी परिस्थिती... मग काय 4G तर अजून अंड्यात पण नाही... पण जगाला वेध लागलेत, 5G चे... हो 5G... चेच...
कालच म्हणजे गुरूवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या टेलीकॉमविषयक बैठकीत पुढच्या पिढीच्या (हे झालं निव्वळ भाषांतर) नेक्स्ट जनरेशन मोबाईल टेक्नॉलॉजीला मान्यता देण्यात आली. या बैठकीत सहभागी झालेल्या तज्ज्ञांच्या मते नेक्स्ट जनरेशनचा म्हणजे अतिप्रगत तंत्रज्ञानाने बनणारा मोबाईल हँडसेट आताच्या 3G पेक्षा तब्बल 500 पट सुपरफास्ट असेल.... म्हणजे तुम्ही कीपॅडवर बोट टेकवायचा अवकाश की तुम्हाला हवं असलेलं अॅप्लिकेशन किंवा एखादा नंबर तुमच्या स्क्रीनवर हजर होईल. यापुढील मोबाईल टेक्नॉलॉजी ही काही फक्त इंटरनेट स्पीडपुरतीच मर्यादित नसेल, तर एकूणच तुमच्या हँडसेटचं फंक्शनही त्या स्पीडच्या तोडीचं असेल.
संयुक्त राष्ट्रांच्या टेलिकॉम समितीने मान्यता दिल्यानंतर आता लगेचच नव्या तंत्रज्ञानाचे मोबाईल हँडसेट बाजारात यायला काहीच हरकत नाही. तरीही मार्केटमध्ये प्रत्यक्षात लाँचिंग व्हायला किमान दोनवर्षे तरी थांबावं लागेल, असं आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियनचे प्रवक्ते संजय आचार्य यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की स्मार्टफोन, टॅबलेट आणि इतर संपर्क माध्यमे सर्वांमध्येच हे नवं सुपरफास्ट तंत्रज्ञान प्रत्यक्षात येईल.
या नव्या तंत्राज्ञानावर आधारित फोन आणि इतर संपर्क माध्यमं आणि सध्याचे फोन यांच्यात अगदी थेट तुलनाच करून सांगायची तर आताचे 3G फोन म्हणजे डायल अप कनेक्शनवर आधारित इंटरनेट कनेक्शन समजा आणि नव्या तंत्रज्ञानाचे पुढील दोन वर्षात प्रत्यक्षात येणारे फोन म्हणजे फायबर ऑप्टिक केबलच्या सहाय्याने कनेक्ट होणारं इंटरनेट... असंही संयुक्त राष्ट्रांच्या टेलिकम्युनिकेशन समितीचा एक अधिकारी सांगतो.
नवीन तंत्रज्ञानाने बनवला जाणारा 500 पट वेगवान फोन म्हणजे एखाद्या वेबसाईटचं पेज ओपन होण्यासाठी कसलाही वेळच न लागणं... असंही संयुक्त राष्ट्काच्या टेलिकम्युनिकेशन कंपनीचे प्रमुख फ्रान्सिस रॅन्सी यांनी सांगतात. अतिप्रगत आयएमटी म्हणजेच इंटरनॅशनल मोबाईल टेलिकम्युनिकेशन. गेल्या 25 पेक्षाही जास्त वर्षांपासूनही अधिक काळ आयएमटी जगभरातल्या मोबाईल क्रांतीला आकार देत आहे. तंत्रज्ञानाची दिशा निश्चित करत आहे.
मोबाईल हँडसेट आणि तंत्रज्ञान यामध्ये क्रांतिकारक बदल करण्याची क्षमता सध्याही आहेच, मात्र त्याला संयुक्त राष्ट्रांची पूर्वपरवानगी आवश्यक असते.
प्रगत आयएमटी सिस्टीममध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम सर्वाधिक क्षमतेनं वापरण्याची सोय आहे. म्हणजेच कमी क्षमतेच्या बँडविड्थवरही हा मोबाईल हँडसेट पूर्ण क्षमतेनं काम करू शकेल. फक्त इंटरनेट अॅक्सेस करण्यापुरतंच नाही तर व्हिडिओ स्ट्रिमिंग करणं, डाटा ट्रान्सफर करण्यासाठीही हे तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार आहे. या अतिप्रगत मोबाईल हँडसेटमुळे व्हिडिओ चॅट, एचडी टीव्ही आणि सुपरफास्ट एसएमएस शक्य होणार आहे.
आता या अतिप्रगत मोबाईल तंत्रज्ञानाला काय नाव द्यायचं ते द्या, कुणी याला 4G म्हणतात तर कुणासाठी हा 5G मोबाईल आहे. या अतिप्रगत 4G तंत्रज्ञानाला आयटीयू म्हणजे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनिअनच्या रेडिओ कम्युनिकेशन असेम्बलीने गेल्या आठवड्यात जिनीव्हामध्ये भरलेल्या बैठकीत मान्यता दिली. आयटीयूने 2009 मध्ये 4G च्या रूपरेषेला, आराखड्याला मान्यता दिली होती. त्यानंतर डिसेंबर 2010 मध्ये एलटीई आणि वायमॅक्स यासारखं तंत्रज्ञानही 4Gचा भाग असेल, असं आयटीयूने जाहीर केलं.
जे 3G आपल्याकडे आता कुठे रूळू लागलंय, त्याची सुरूवात जागतिक पातळीवर 2000 पासूनच झालीय.
आजपासून किमान दोन वर्षांनी येऊ घातलेलं अतिप्रगत फोन तंत्रज्ञान आत्ताच्या 3G च्या तुलनेत 500 वेगवान म्हणजेच 100 मेगाबाईट्स प्रति सेकंद एवढ्या प्रचंड वेगाने संदेशवहन होईल, असा विश्वास संयुक्त राष्टांचे फ्रान्सिस रॅन्सी व्यक्त करतात.
म्हणजे एखाद्या टीव्ही कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग फक्त 20 सेकंदात तुमच्या हँडसेटमध्ये डाऊनलोड होऊ शकेल, आणि एखाद्या मिनिटभरात संपूर्ण सीडी तुमच्या मोबाईलमध्ये य़ेऊ शकते.
एवढ्या प्रचंड वेगाचा सामना करायला तयार आहात का तुम्ही ??

No comments:
Post a Comment